मुलगा अधिकारी व्हावा म्हणून बापाने ऊसाच्या गुऱ्हाळात घाम गाळला; वडिल म्हणतात पोराने कष्टाचं चीज केलं, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान..!

नेवासा: ऊसाच्या फडात रात्रंदिवस कोयत्त्याशी दोन हात करुन आपल्या वाट्याला आलेले आठराविश्व दारिद्र झटकून टाकण्यासाठी लढा पुकारणाऱ्या एका ऊसतोड कामगाराने किमान मुलाच्या हाच आपला संसार समजून मनाशी खूनगाठ बांधली. अगदी दिवाळी सणही या फडातच साजरा करुन रात्रंदिवस आपल्या वाट्याला आलेले दारिद्रय घालविण्याचा चंग मनी बाळगत अविरतपणे मोठे काबाडकष्ट केले.
केवळ जिद्दीच्या जोरावर आपल्या मुलाने शिक्षण घेवून खुप मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहण्याऱ्या ऊसतोड कामगाराने ते चक्क सत्यात उतरवले आहे. महामेरु पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांचे पिताश्री ‘बापूंची’ नेवासा फाटा येथे दैनिक प्रभातच्या प्रतिनिधींशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी दैनिक प्रभातशी हसत खेळत गप्पा मारत संवाद साधला.
थेट उसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आपल्या मुलाने मजल मारण्यासाठी एका बाप मानसाने कसा लढा दिला आणि अगदी बुद्धिमान असलेल्या मुलाने आपल्या आई – वडीलांच्या कष्टाचे चिज कसे केले, याबाबत त्यांनी सांगितले.
“लाखात एक.. माणूस नेक…! “आहे ‘तो’ साधाभोळा”!
“वेळप्रसंगी धावत जाई असा ‘तो’ हिंमतवाला… असल्याची खरी जाणीव दैनिक प्रभात’शी बात्तचित करतांना उघड झाली. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांची आई – वडीलांवर मोठी अपार माया आणि श्रद्धा आहे. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच आज मी हे यशाचे शिखर गाठवू शकलो, असे संतोष खाडे नेहमी सांगतात.
आई – वडीलांच्या कष्टांमुळेच हे साध्य झाल्याचे सांगून ते कितीही बुद्धीमान असले तरी ते त्यांच्या आई – वडीलांनाच याचे श्रेय देवून मानाचे ‘स्थान’ देत असतात. ‘बापू’ हे नेवासा येथे अचानक आपल्या मुलाला भेटण्यासाठी आले होते. पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या व्हॉटस् अॅप स्टेटसला ‘बापूंचे स्वागत आणि ‘बापू’ हेच माझे सर्वस्व असल्याचे दैनिक प्रभातला त्यांच्या टेटसला दिसल्यामुळे दैनिक प्रभात’ने ‘बापूंशी’ संपर्क साधला.
साधा भोळा देव माणूस मुलगा पोलीस अधिकारी असल्याचा कवडीचाही गर्व न बाळगता जमीनीवर पाय ठेवून वागणाऱ्या निश्चयाचा महामेरु असलेल्या बापूंशी संपर्क झाला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपल्या वाट्याला आलेले दारिद्र पुन्हा आपल्या
मुलाच्या तरी वाट्याला जावू नये म्हणून आम्ही उसाच्या फडात काबाड कष्ट केले.
माझ्या मुलानेही आमच्याबरोबर काम करुन आम्हालाही ‘साथ’ देत अपार मेहनत घेतली, असे त्यांनी निशून सांगितले. स्पर्धा परीक्षेतून उसाच्या फडातून थेट लाल दिव्याच्या गाडीपर्यंत धाव घेतली आणि आमच्या कुटूबियांचे स्वप्न पुरे केले. याचाच आम्हाला मोठा सार्थ अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.





