मुंबई : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच “क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अंधेरीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वि.वि. करमरकर यांच्या पार्थिवावर अंधेरीतील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी दैनिकात 1960 च्या आधी क्रीडा बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. करमरकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे क्रीडा बातम्यांना संपूर्ण पान मिळाले. मराठी दैनिकात पहिल्यांदाच क्रीडा बातम्यांना संपूर्ण पान देण्याचा प्रयोग त्यांनी राबवला आणि त्याला प्रतिसादही मिळाला. खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक यांचे प्रयत्न यामाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. सर्वात आधी वृत्तपत्रात क्रीडा बातम्यासाठी वेगळं पान त्यांनी सुरु केल्यामुळे त्यांना “क्रीडा पानाचे जनक” म्हणूनही ओळखलं जात होतं. असे हे वि. वि. करमरकर माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचकही होते. ‘करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/india-clinch-junior-kabaddi-world-title-after-defeating-hosts-iran-in-final/ क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खोखो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/irani-cup-rest-of-india-beat-madhya-pradesh-to-win-title/ खो खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची खोखो खेळाडूंना दारे उघडली गेली! दुसऱ्या बाजूला सिझन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असल्यास त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. परिणामी टेनिस क्रिकेटला महत्त्व देता कामा नये, यामुळे युवा खेळाडूंचा वेळ, मेहनत वाया जाते. यातून हाती काही लागत नाही. म्हणून त्यांनी कधीच टेनिस क्रिकेटचा फोटो सोडाच, सिंगल बातमी सुद्धा लावली नाही. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/steve-smith-is-set-to-continue-as-captain-for-the-final-indvaus-test-in-the-absence-of-pat-cummins/ क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी स्वतः दिवसाचे अनेक तास खर्च करत इतरांसमोर ठेवला. यामुळे करमरकर यांच्या लेखणीला धार होती. प्रसंगी कौतुक करताना त्यांची लेखणी प्रचंड टोकदार होत असे. यातून मग कोणाची सुटका नसे! खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला होता,