पुरी : परी येथील जगन्नाथ मंदीराच्या 592 कोटीच्या ठेवी पेचप्रसंगातील येस बॅंकेत अडकल्या आहेत. या देवस्थानापुढे रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाने अडचणी वाढल्या आहेत
देवस्थानच्या ठेवी मंदिर प्रशासनाकडून राष्ट्रीयकृत बॅंकेत वर्ग करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार येस बॅंकेला तसे कळवण्यात आले होते. बॅंकेने 19, 23 आणि 29 मार्च अशा तीन टप्प्यात पैसे परत देऊ असे कळवले होते. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या आदेशाने या व्यवहाराच्या पुर्ततेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
देवस्थानचे एक विश्वस्त रामचंद्र दास महापात्रा यांनी देवस्थानच्या ठेवी सुरक्षित राहतील, याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, पुरीचे माजी आमदार महेश्वर मोहंती यांनी देवस्थानचे पैसे येस बॅंकेत ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी तातडीने रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी सुचना केली आहे.