Kondhwa case : केलेला बनाव उलटला! तक्रारदार तरुणीच आरोपीच्या पिंजऱ्यात; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Kondhwa case : पुण्यातील कोंढवा परिसरात एका संगणक अंभियंता तरुणवीर बलात्कार करण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. कोंढवा बलात्कार प्रकरणी खोटी माहिती दिल्याने तरुणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणीने अत्याचाराचा बनाव करत हा सर्व प्रकार का केला, हे ती सांगत नसल्याने न्यायालयाच्या परवानगीने या गुन्ह्याचा तपास करून तिने हा सर्व प्रकार का केला? याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल करणे यानुसार तरुणीवर विविध कलमांन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तरुणीने तक्रारीत काय म्हटलं होतं?
तरुणीने कोंढवा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 2 जुलैला घरामध्ये घुसून एका डिलवरी बॉयने बलात्कार केला असल्याचे म्हटले होते. तिने दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तब्बल 500 सीसीटीव्ही तपासण्यात आले होते. मात्र, तपासात हा डिलिव्हरी बॉय नसून परस्पर सहमतीने दोघांनी स्वतःचे फोटो काढले आणि ते एकमेकांचे मित्र असल्याचे निष्पन्न झाले.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील कोंढवा परिसरात कुरिअरबॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हा सर्व बनाव तरुणीनेच रचला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा : Manikrao Kokate : मला रम्मी खेळताच येत नाही; हा छोटा विषय, इतका का वाढवता? माणिकराव कोकाटेंची सारवासारव





