‘या’ दिवशी होणार धनुष हॉलिवूड चित्रपट भारतात प्रदर्शित

‘व्हाय दिस कोलावरी डी’ या गाण्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेला तामिळ सुपरस्टार ‘धनुष’ याचा हॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेला ‘द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ हा सिनेमा लवकरच भारतात देखील प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडमध्ये 2018 ला प्रदर्शित करण्यात होत. मात्र, आता धनुषचा हा चित्रपट येत्या 21 जून रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धनुष्यने एका जादूगाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केन स्कॉट यांनी केले आहे.

धनुष यापूर्वी ‘मारी’, ‘मारी-2’ या सारख्या अनेक तामिळ चित्रपटात दिसला होता. तर बॉलीवूडमध्ये तो ‘रांझना’आणि ‘शमीताभ’ सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसला होता .

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×