राज्यभरात मतदानाचा उत्साह; ९ वाजेपर्यंत ८ टक्के मतदान

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 31, तर बारामती मतदारसंघातून 18 उमेदवार रिंगणात आहे.

राज्यभरात उत्साहात मतदान सुरु असून पुण्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर 6.71 टक्के, माढा, 7.25 टक्के, बारामती 6.1 टक्के, सांगली 7 टक्के, अहमदनगर 4 टक्के, औरंगाबाद 9 टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.