Satara | मतदार राजा योग्य नेतृत्वाचीच निवड करेल

म्हासुर्णे, (प्रतिनिधी) – जनतेला पोकळ आश्वासने न देता गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. येथील मतदार राजा हा एक जागृत नागरिक असून तो वरवरच्या प्रलोभनांना बळी न पडता योग्य नेतृत्वाचीच निवड करेल, याची मला खात्री आहे असे प्रतिपादन माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
खटाव तालुक्यातील चोराडे या गावी झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आ. बाळासाहेब पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या प्रमुख समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या.
मतदारसंघातील प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, शेती सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व इतर सुविधा उपलब्ध होण्यासाठी सदोदित प्रयत्न केलेला आहे. जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने पुढेही अशी विकासकामे सातत्याने करत राहीन, असे सांगितले.
चोराडे येथील थोटे मळ्यातील गणेशनगरात सिमेंटचा रस्ता, जोतिबा मळ्यातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच, नांगरे मळ्यातून जाणाऱ्या रहाटणी ते भुषणगड रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ केला.
दत्त मंदिरासमोरील सभागृहाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय महादेव चौकातील गटार बांधणी, सिमेंट काँक्रेटचा रस्ता व कोलीस्त मळा येथील रस्ता आदी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, जितेंद्र पवार, शिवाजी सर्वगोड, सी. एम पाटील, सह्याद्री कारखाना संचालक संजय थोरात, संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, सुहास पिसाळ, तुषार माने, दत्तात्रय रुद्रुके, संभाजी थोरात, सुहास शिंदे,
महादेव माने, दादासो कदम, दाऊत पटेल, दिग्विजय पिसाळ, युवराज शिंदे,गुलाब वायदंडे, प्रविण थोरात, कृष्णत पिसाळ, संजय पिसाळ,दिनकर पिसाळ, नारायण पिसाळ, सुदाम पिसाळ,विजय पिसाळ, पदाधिकारी महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.





