Yashomati Thakur | मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशासमोर पुराव्यासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. याचमुळे राज्यात विरोधकांकडून मतदार यादी स्वच्छ करूनच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याला न जुमानता नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ‘निवडणूक आयोग अपंग झालाय, पॅरालिटिक आहे’ यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाईट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही, ती व्यवस्थित काम करत नाही, हे आता सिद्ध झाले आहे,” असे यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे. Yashomati Thakur | अन्यथा लोकशाहीला कोणताही अर्थ उरणार नाही याशिवाय यशोमती ठाकूर यांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण देत, त्यांनी अनिस खान नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोनदा नोंदणी झाल्याचे आणि गैर-मुस्लिम व्यक्तीने त्या मताचा वापर केल्याचे नमूद केले. ही व्होट चोरी असून, असे प्रकार रामपूरप्रमाणे अमरावती, छिंदवाडामध्येही होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दुरुस्त केला पाहिजे, अन्यथा या लोकशाहीला कोणताही अर्थ उरणार नाही, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे. Yashomati Thakur | हेही वाचा: “१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी”; अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप