Republic Day : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन सोहळ्यानंतर बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादरीकरणासह लेझीम, झांज, घुंगरूकाठी, डंबेल्सवर कवायती सादर केल्या. तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, डॉ. आनंदीबाई जोशी, झलकारी बाई, करतारसिंग सर्भा, नीरा आर्य या थोर विभूतींच्या व्यक्तिरेखा सादर केल्या. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. अभिजीत देशमुख, स्वानंद प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, सचिव अभिषेक मनोरे, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, कीर्ती मनोरे, दादासाहेब मनोरे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विलास नऱ्हे, सचिव संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते सोमशेखर कमतगी, शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष वंदना कदम, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव दीपिका अग्निहोत्री यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. Republic Day : ॲड. देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, स्वराज्य स्थापनेतून मिळालेली भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. मुलांना एखाद्या मॉलमध्ये नेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा किल्ला, एखादे तीर्थक्षेत्र येथे न्यावे. येणाऱ्या पिढीच्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा, शालेय अभ्यासासह इतर क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे असे मार्गदर्शन देशमुख यांनी केले. प्रशांत मनोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. शाळेतील शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन केले. सोहळ्याचा समारोप “वंदे मातरम” या गीताच्या सादरीकरणाने झाला. Republic Day :