Maharashtra Local Body Elections 2025 | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडत असून नगर परिषद, नगर पंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र यात मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, परंतु निकाल मात्र 21 डिसेंबरलाच जाहीर केले जातील. याचिका उच्च न्यायालयात दाखल निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने मतदानाच्या दोन दिवसापूर्वी राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. परंतु सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे. अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. परंतु या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, हे पाहुयात… निकाल लांबणीवर पडल्याने काय होणार परिणाम? ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत प्रशासनाला राखीव ठेवावे लागणार आहे. सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. ही मोठी जबाबदारी राहणार आहे. स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ती प्रक्रिया 21 नोव्हेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांना सातत्याने करावी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडल्याने साधारणपणे तीन आठडवडे पोलिस यंत्रणा, निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना आणि प्रशासनाला सजग राहावे लागणार आहे. निर्णयावर देवेंद्र फडणवीसंकडून नाराजी व्यक्त दुसरीकडे नागपूर खंडपीठाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने निवडणुका पुढे जाणे हे यंत्रणेचे अपयश असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “घोषित केलेल्या निवडणुका, त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटत की एकूणच ही पद्धत फार योग्य नाही. नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण यातून जे उमेदवार आहेत, मेहनत करतात. त्यांचा भ्रमनिरास होतो. मला वाटतं हे योग्य नाही. अशा खूप निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सुनावले. याशिवाय आता पुढच्या निवडणुकात असे होता कामा नये, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. Maharashtra Local Body Elections 2025 | हेही वाचा: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : दहशतवादी दानिशच्या फोनमधून महत्वाचे पुरावे हाती