मुंबई – राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यासाठी निकष निश्चित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निकषांच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुधारित वेतनश्रेणी 1 जुलै पासून परिणामकारक राहील.
साहसी पर्यटन धोरण
मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल.
वैद्यकीय अधिकऱ्यांचेनिवृत्तीचे वय 62
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.