उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिनानिमित्ताने दाम्पत्याचे न्यूझीलंड येथे वृक्षारोपण

बारामती (प्रतिनिधी) बारामतीतील दाम्पत्याने न्यूझीलंड येथे वृक्षारोपण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या सुरक्षित रहा असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.
एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व्हर्च्युअल वृक्षारोपण एक कुटुंब एक झाड या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील सायली हिल येथील रहिवासी परंतु सध्या न्युझीलँड येथील अकलन शहरात राहत असलेले जगन्नाथ नाळे (वय ६५) व त्यांच्या पत्नी पुष्पलता नाळे. या दाम्पत्याने देखील एक कुटुंब एक झाड या उपक्रमात सहभाग नोंदवला.
न्यूझीलंड येथे राहत असलेल्या अकलन शहरात त्यांनी कागदी लिंबाचे झाड लावून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सायली हिल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत १५१ झाडे या परिसरात लावण्यात आली आहेत. नाळे दाम्पत्य देखील याच परिसरातील रहिवासी असल्याने १५१ क्रमांकाचे वृक्ष न्यूझीलंड येथे लावला . नाळे दांपत्याने न्यूझीलंड येथे केलेले वृक्षारोपण वृक्षप्रेमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरल्या .
एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनातून शहरातील सायली हिल परिसरात सोशल डिस्टंसिंग पाळून वृक्षारोपण करण्यात आले आहे. सायली हिल येथील रहिवासी परंतु सध्या न्युझीलँड येते राहत असलेले नाळे दांपत्ये यांनी देखील या वृक्षरोपण यात सहभाग घेतला. व १५१ व्या क्रमांकाचे झाड त्यांनी न्युझीलँड येथे लावले. ही बाब बारामतीकरांसाठी अभिमानास्पद आहे.
– मंगेश ओमासे, राष्ट्रवादी कार्यकर्ते बारामती





