व्हॉटस्‌ऍपच्या ग्रुप ऍडमीनवरसह दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी – ठराविक धर्माच्या नागरिकांकडून कोणतेही साहित्य खेरदी करू नका, अशी व्हॉटस्‌ऍपवर पोस्ट टाकण्यात आली. याप्रकरणी ग्रुप ऍडमीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी परिसरात घडली.

सुशीलकुमार सिमरूराम खैरालिया (वय 54) आणि अमित मनोज भालेराव (वय 33, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी विकास निलचंद दुधे यांनी शनिवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भालेराव हा अमित भालेराव मित्र परिवार या ग्रुपचा ऍडमीन आहे. तर आरोपी सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. आरोपी सुशीलकुमार याने त्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून काही साहित्य खरेदी करू नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका, अशी द्वेषभावना पसरविणारी माहिती टाकली. या पोस्टला ऍडमीन हा देखील जबाबदारी असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.