Sanjay Raut | शिवसेनाचा दसरा मेळावा ही परंपरा आहे. मात्र शिंदे गटाच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होत आहेत. उद्धव सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर तर गोरेगाव येथील नेस्कोच्या मैदानावर शिंदे सेनेचा दसरा मेळावा होईल. तर दुसरीकडे नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्या देखील महत्त्व असते. याबाबत संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नसल्याचे म्हंटले. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “संघाच्या संचालनात स्वयंसेवकाच्या हातात काठ्या असतात. काठीच्या माध्यमातून देशाचे संरक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे. पण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, आम्हाला काठ्या नाही तर एके ४७ हवी आहे. तर आम्ही जम्मू-काश्मीरसह सर्व सीमांवर देशाच्या संरक्षणासाठी तयार राहू. काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही. संघाच्या हाती आज देशाची सत्ता आहे. त्यांनी पंतप्रधान आणि इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या संचलनाला सत्तेचे तेज आहे. संघाची शताब्दी झाल्यानिमित्त एक नाणे आणि पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. पण स्वातंत्र्य लढ्यात संघाचे नेमके काय कार्य होते? हे त्यांनी सांगितले पाहिजे,” असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut | संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावरही भाष्य केले आहे. “आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे नाव संघाबरोबर जोडण्याच प्रयत्न केला जातो. पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे. याबाबत आमच्या मनात शंका नाही. आमचीही कधीकाळी त्यांना सहानुभूती होती. जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असते तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांविषयी भूमिका घेतलेल्या नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. Sanjay Raut | संजय राऊत यांचा चंद्रचूड यांना टोला दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना या कार्यक्रमासाठी संघाने निमंत्रित केले होते. मात्र प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत असून विजयादशमीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलताईंनी स्पष्ट केले. यावरून, कमलाताई गवई संघाच्या जाळ्यात अडकल्या नाहीत. त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नसल्याचा टोला संजय राऊत यांनी चंद्रचूड यांना लगावला. Sanjay Raut | तर उद्धवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी ग्राऊंड लेव्हलाला दोन्ही पक्षांच्या युतीचे काम सुरू झाले आहे. याबाबतची भूमिका दोन्ही पक्षाचं प्रमुख मांडतील, असे सांगितले. Sanjay Raut | हेही वाचा: Nushrratt Bharuccha: नुसरत भरुचा नायग्रा धबधब्याच्या सान्निध्यात; सोशल मीडियावर शेअर केले आनंदी क्षण