पुणे जिल्हा | सासवडच्या वैभवात पुरंदरे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे

सासवड, (प्रतिनिधी) – सासवडचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव खुप मोठे आहे व त्यात पुरंदरे परिवाराचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. अंबाजीपंत पुरंदरेंनी पेशव्यांना घडवण्याचे काम केले हा इतिहास आहे. अशा पुरंदरे परिवारातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत तथा काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाच्या पुरस्काराचे एक वेगळे स्थान आहे असे प्रतिपादन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले.
सासवड (ता पुरंदर) येथील कर्हाबाई मंदिरामध्ये मुंबई येथील काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत तथा काकासाहेब पुरंदरे यांच्या 84 व्या जयंती निमित्त त्यांच्या नावाचा पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार दत्तात्रय भोंगळे यांना येथील कर्हाबाई मंदिरात प्रदान करण्यात आला त्यावेळी कोलते बोलत होते. पाच हजार रुपये रोख शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
सरदार अप्पासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, पुरंदरे यांच्या कन्या अॅड. आरती सदावर्ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब खाडे, एस. के. देशपांडे, हेमंत ताकवले, डॉ संगीता पारनेरकर, राजलक्ष्मी तथा डिंपल एकसंभेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, सुनील लोणकर, योगेश कामथे, अमोल बनकर, हेमंत भोंगळे, मोहन वांढेकर, बाळासाहेब भिंताडे, कुंडलिक मेमाणे, डॉ. राजेश दळवी, अॅड. नितीन जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद लोमटे यांनी केले.





