महिला बस चालकांचा आत्मविश्‍वास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्‍त केला विश्‍वास

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला वाहकांना कधीच एन्ट्री देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने आता यापुढे जावून महिलांसाठी नव्या संधीची कवाडे खुली केली आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. यापुर्वीच याविषयीची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने दिली होती. याच पाललेट प्रोजेक्‍टचे उद्‌घाटन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन, महिलांच्या शक्‍तीचा सामाजिकदृष्ट्या सन्मान केला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या महिला ज्यावेळी बस चालवतील तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्‍वास आणि धाडस हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारे असेल असा विश्‍वास यावेळी प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्‍त केला. महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यानुसार, 2406 पदावर महिलांची भरती केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. मात्र, आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली आहे. त्यासाठी आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)