काबुल – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात तिघेजण विमानातून पडल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. काबुल विमानतळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Don’t just look at it. Look into it. One picture. So many stories.#Afghanistan pic.twitter.com/aUTLWSJtzx
— Zain Awan🇮🇳 (@zayen) August 17, 2021
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी चक्क विमानतळाच्या धावपट्टीवरच गर्दी केली होती. विमान धावपट्टीवरून धावायला लागले तेंव्हा ही गर्दी विमानाच्या बरोबरच धावायला लागली होती. यापैकी काहीजणांनी जीवाची भीती न बाळगता विमानाच्या टायरला आणि लॅन्डिंग गीअरला लोंबकळायला सुरूवात केली. मात्र तशाही परिस्थितीत विमानाने टेक ऑफ केले.
ज्या विमानात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्या विमानातील आतले फोटो बाहेर आले आहेत. अमेरिकन सैन्याच्या कार्गो विमानामध्ये तब्बल 640 लोक दाटीवाटीनं बसले असल्याचं समोर आलंय. रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. तालिबानच्या जुलमी राजवटीत जाण्याऐवजी लोक देशातून बाहेर पडण्यास पसंती देत आहेत.
अफगाण नागरिकांची भयावह परिस्थिती अमेरिकेच्या एका विमानातही दिसून आली. अमेरिकेच्या या विमानात १३४ प्रवाशांची क्षमता होती. मात्र, त्यामध्ये ८०० जणांना प्रवेश देण्यात आला.
“The Crew Made the Decision to Go:” Inside Reach 871, A US C-17 Packed With 640 Afghans Trying to Escape the Taliban | @TaraCopp and @MarcusReports https://t.co/lf3LajxzzX pic.twitter.com/6wg82LtfRc
— Defense One (@DefenseOne) August 16, 2021
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवाई दलाच्या सी-१७चा दरवाजा उघडताच अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी धडपड करणाऱ्यांनी विमानात प्रवेश करण्यासाठीची धडपड सुरू केली. इतक्या प्रवाशांसह उड्डाण घेण्याबाबत शंका होती. मात्र, विमानाच्या क्रूने कोणत्याही प्रवाशांना बाहेर काढले नाही आणि जवळपास ८०० जणांसह उड्डाण घेण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये जवळपास ६५० अफगाण नागरीक होते.