नेवासा – विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळे सध्या राजकीय आखाड्यात चुलबूलपांडे कार्यकर्त्यांची मोठी चलती निर्माण झालेली असून सकाळी एका पार्टीकडे असणारा कार्यकर्ता राञी दुसऱ्याच फडात वावरतांना दिसून येत असून ज्या – त्या नेत्याला जाईल तेथे हा नटरंग कार्यकर्ता त्यांचे आता काही खरे नाही ? सगळीकडेच आपली हवा आहे? आपला विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा बागुलबुवा उभा करुन प्रत्येक नेत्याला चांगलीच हवा भरुन देतांना दिसत आहे संबंधित नेत्यालाही हा महाशय चोटर असल्याची माहीती असतांनाही किमान आपल्या बद्दल तो कशी शब्दफेक करतो हे पाहण्यासाठी हे नेतेही सध्या चुलबूलपांडे लोकांचे मन न दु:खवता आपला राजकीय फायदा जरी झाला नाही तरी या चुलबूलपांड्याकडून तोटा नको म्हणून मनधरणी करण्याची वेळ राजकीय फडात सध्या सुरु झालेली आहे. निवडणूकाजवळ आल्या की,गुरुकिल्ल्या फिरवणारांची मोठी चलतीच सध्या राजकीय रणांगणात निर्माण होत असल्याचे दिसून येत असून सकाळी एका फडात दिसणारा हा अवलिया राञी दुसऱ्याच फडात जावून राजकीय हवा भरतांना ही चालबाज मंडळी विरोधकांचा अंदाज घेण्यासाठी मी तिकडेही चक्कर मारुन आलो होतो? असे सांगून राजकारणातील काही किल्ल्याबहाद्दर कार्यकर्ते आता या नेत्याला आपली शंका नको? म्हणून स्वता:हून स्पष्टिकरण देत हळूच आपले कारनामे सांगून मदतीची पावती देवून आपले काम फत्ते करुन घेतांनाही चालबाज मंडळी चांगलीच तरबेज झालेली असल्याचे दिसून येत असून ऐरवी ज्यांचे तोंडही कोणी सकाळी पहात नव्हते अशांना आता निवडणुकीमुळे गुरुकिल्ल्या करणाऱ्यांना चांगलाच भाव आल्याचे दिसून येत आहे. ऐरवी घरातही आपल्या माणसांशी सुत जमत नसतांना आता हे किल्ल्याबहाद्दर अवलिया नेत्यांना हवा भरुन मीच कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून देत असल्यामुळे हरहुन्नेरी अवलियांनी सध्या चांगलीच चलती निर्माण करुन राजकीय नेत्यांवर धाडसञ राबवितांना दिसून येत आहे.