अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली

Updated On:-13 फोटो
Photo 1
1 / 13

आणखी संबंधित फोटो

अयोध्या: अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात आहे. त्याची मुहूर्तमेढ उद्या भूमिपूजनाने रोवली जाणार आहे. त्यामुळे अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली असून शरयु तिरावरील रोषणाई नेत्रदीपक आहे. शहरात केंद्रीय सुरक्षा दलांनी तळ ठोकला असून या पुरातन शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अवघ्या देशांत या निमित्ताने उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी दीपोत्सव आणि रांगोळ्यांचेर नियोजन करण्यात आले आहे. केवळ देशांतच नव्हे तर अमेरिकेतही दिवाळी साजरी करण्यात येत आहे.

अयोध्येतील सर्व घरांना त्रेता युगाचा आभास निर्माण करण्यासाठी पिवळ्या रंगात रंगवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

इष्ट देवतांसह प्रभू श्रीरामांना आवाहन करण्याचा सोहोळा सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे. त्यावेळी वैदिक संत श्रीरामांना तात्पुरत्या आसनावर स्थानाधिष्टीत होण्याचे आवाहन रामचरण पुजेने सकाळ साडे दहाच्या सुमारास करतील.

रामचरण पुजेचे चार भाग असतील. पहिल्या सत्रात अन्य देवतांचे पूजन केले जाईल दुसऱ्या नल, नील, सुग्रीव यांसारख्या प्रभू रामचंद्राच्या सेनानींना पूजिले जाईल. तिसऱ्या टप्प्यात राजा दशरथांची सपत्नकि पूजा केली जाईल .तर चौथ्या टप्प्यात प्रभू रामचंद्रांची पूजा त्यांच्या 1008 नावांचीे उच्चारण करत केले जाईल.

महादेवी, भगवान शंकर, गणेश आणि 10 दिापालशोदश मातांचेही यावेळी पूजन केले जाईल. दरम्यान अमेरिकेतील मंदिरात या पायाभरंणी समारंभानिमित्त आनंदोत्सव करण्यात येणार आहे. तेथे विशेष पूजा आणि विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाणार असून घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे. प्रख्यात टाईम्स स्क्वेअर चौकात एलईडी स्क्रीन लावून भूमीपूजनाचे प्रक्षेपण केल जाणार आहे, असे इंडो अमेरिकन संघटनेने स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील आपल्या शासकीत निवासस्थानी दीपोत्सव केला. फटाके उडवून आणि दीप लावून त्यांनी आनंद व्यक्त करत दिवाळी साजरी केली. नागपूरमध्ये रा. स्व. संगाच्या स्वयंसेवकांनी रामचरीत मानस आणि हनुमान चालिसाचे पठण केले.

आणखी संबंधित बातम्या

Sangeet natak akademi awards : महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव.! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

Sangeet natak akademi awards : महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव.! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

Assam News : आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढती; आकडेवारी एकदा पाहाच...

Assam News : आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढती; आकडेवारी एकदा पाहाच...

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल 4 रुपयांनी झाले स्वस्त; केंद्रसरकारचा मोठा निर्णय !

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल 4 रुपयांनी झाले स्वस्त; केंद्रसरकारचा मोठा निर्णय !

TOP NEWS 10 : दिल्लीतील पुन्हा अग्नी तांडव ते पंतप्रधान मोदींच गुपित उघड...; वाचा टॉप 10 बातम्या

TOP NEWS 10 : दिल्लीतील पुन्हा अग्नी तांडव ते पंतप्रधान मोदींच गुपित उघड...; वाचा टॉप 10 बातम्या