Pimpri : शहरातील बाजारपेठेत झगमगाट

पिंपळे गुरव: लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी शहरभर सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठेत रोषणाईच्या सजावटींचा झगमगाट दिसू लागला आहे. झुंबर, लाइट बार, फोकस लाइट्स, एलईडी माळा अशा शेकडो व्हरायटी उपलब्ध झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. यंदा चीनी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या साहित्याला अधिक मागणी दिसून येत आहे.
मुंबई-पुणे शहरा बरोबरच स्थानिक उत्पादकांकडून बाजारात आणलेल्या झुंबर, रोटेशन बल्ब, स्मोक लाइट्स, रंगीत दिव्यांच्या शेकडो व्हरायटीने दुकाने सजली आहेत. तीस रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत किंमती असल्याने प्रत्येकालाच आवडीनुसार खरेदी करता येत आहे.
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा क्षण. सजावट त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. आम्ही शक्य तितकी स्वदेशी रोषणाई घेण्याचा प्रयत्न करतो,” असे किरण जाधव यांनी सांगितले. सजावटीची स्पर्धा प्रत्येक घराघरांत असते. मुलांना तर रंगीबेरंगी लाइट्सची खास आवड आहे,” असे राजेश्री पाटील यांनी सांगितले.
विक्रेत्यांचा प्रतिसाद
यंदा ग्राहक स्वदेशी उत्पादनांकडे अधिक वळले आहेत. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना चालना मिळते आहे. चीनी वस्तूंपेक्षा भारतीय बनावटीच्या माळा, लाइट बार, झुंबर यांना भरघोस मागणी आहे, असे विक्रेते भरत लालवाणी यांनी सांगितले.
दर झलक (रुपयांत)
एलइडी माळा : ३० ते १०००
लाइट बार : १५० पासून
फोकस वाल्व : ८० पासून
स्वदेशी माळा : २०० पासून
चक्र : ३०० ते ६००
झुंबर : २५० ते ५००
स्मोक लाइट्स : ३५० पासून





