सभापतींनी बोलावली 30 जानेवारीला सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी  30 जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे तर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी 31 जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.

तर केंद्र सरकारने 30 जानेवारी रोजी सकाळी सर्व राजकीय पक्षांची बैठकही बोलविली आहे. या संमेलनांचा उद्देश संसदेच्या आगामी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही अशीच बैठक बोलविली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातं गदारोळ होण्याची शक्यता आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याव्यतिरिक्त विरोधी पक्ष एनपीआर आणि एनआरसीचा मुद्दा उपस्थित करू शकतात. याशिवाय अनेक मुद्दे उपस्थित होऊ शकतात .  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी   राष्ट्रपती राम नाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. हे सत्र 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.