तरुणांची हुल्लडबाजी आणि क्षणात झाला अपघात Morbi Bridge कोसळतानाचा सीसीटीव्ही आला समोर Watch Video

नवीदिल्ली – गुजरातमधील मोरबीमध्ये नदीवरील ब्रिज कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात १०० हुन अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. मच्छू नदीवर झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. ज्यात काही तरुण पुलावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. तसेच या तरुणांच्या हुल्लडबाजीमुळेच हा अपघात झाला असल्याचा अनेकजण दावा करत आहेत.
सीसीटीव्हीमध्ये काही तरुण पुलावर उभे असल्याचे दिसतात.अनेकजण यावेळी मोबाईलवरून फोटो देखील काढताना दिसत आहेत. त्यातीलच काही जण हुल्लडबाजी करत जोरजोरात ब्रिज हलवताना दिसत आहेत. त्याच वेळी पूल तुटतो आणि सर्वजण खाली कोसळतात. प्रत्यक्षदर्शनी असलेल्या अनेकांनी देखील काही जण मुद्दाम पूल हलवत असल्याचे सांगितले आहे. रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली होती.
CCTV footage of moment before #Morbi bridge collapse. Deeply painful! 👇 pic.twitter.com/vtzuPvQ4B8
— YSR (@ysathishreddy) October 31, 2022
पंतप्रधानांनी केल्या भावना व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यावेळी मोरबी पूल दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले- मी एकता नगरमध्ये आहे, माझे मन मोरबीतील पीडितांशी जोडले गेले आहे. अशी वेदना मी माझ्या आयुष्यात क्वचितच अनुभवली आहे असं म्हणत पंतप्रधानांनी प्राण गमावलेल्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच अपघातग्रस्तांना शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन देखील मोदींनी यावेळी दिले.

