शिक्रापूर – येथे किरकोळ कारणातून सख्या भावाने आपल्या भावाचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना घडली. दिलीप ताराचंद मोरे (वय 35, रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. तीसगाव ता. औरंगाबाद) याचा मृत्यू झाला.
याबाबत गंगू दिलीप मोरे (रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सोनू ताराचंद मोरे (वय 35, रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
शिक्रापूर येथील राऊतवाडी येथे तुकाराम वाबळे यांच्या वीटभट्टीवर काही कामगार काम करीत आहेत. येथे दिलीप मोरे व सोनू मोरे हे देखील आपल्या कुटुंबियांसह काम करतात. 13 मार्च रोजी सोनू मोरे याने त्याचा भाऊ दिलीप मोरे याला शिवीगाळ करत तू तुझ्या मेव्हण्याच्या शिव्या खातो, मेव्हण्याचे ऐकतो असे म्हणून मी तुला सोडतच नाही अशी, धमकी देत चाकूने दिलीप याच्या छातीवर वार करत जखमी केले.
दरम्यान दिलीप याला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.