ब्रिटनकडून युरोपिय संघाच्या उल्लेखाशिवाय पासपोर्ट द्यायला सुरुवात

लंडन – ब्रिटन युरोपिय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत दिवसेंदिवस संदिग्धता वाढत आहे. अशातच ब्रिटनकडून नव्याने दिल्या जायला लागलेल्या पासपोर्टवर “युरोपिय संघा’चा उल्लेखच वगळण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारीक तडजोड ठरावाशिवायच ब्रिटनने युरोपिय संघातून बाहेर पडण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट होते आहे.
30 मार्चपासून अशा स्वरुपाचे नवीन पासपोर्ट दिले जायला सुरुवात करण्यात आली आहे, असे ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. युरोपिय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्यासाठी 29 मार्च ही मुदत आगोदर निश्‍चित करण्यात आली होती. तसा ठराव 2017 मध्ये युरोपिय संघाबरोबर ठरावही करण्यात आला होता. अलिकडे नव्याने देण्यात आलेल्या पासपोर्टमध्ये “युरोपिय युनियन’ हे शब्द वगळण्यामागील कारण केवळ खर्चात कपात करणे हा एकमेव उद्देश असल्याचेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.