अफगाण स्त्रियांची हे दृश्य पाहून ब्रिटीश लष्कर सैनिकांना आपले अश्रू अनावर

काबुल – अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे.
तालिबानने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या 15 वर्षांवरील तरुणी आणि विधवा महिलांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. तसेच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत होते. या महिलांना उचलून नेत सेक्स गुलाम बनविले जात होते.
अनेक अफगाणी लोक देश सोडण्यासाठी विमानतळावर पोहोचले आहे. अशातच तेथील अनेक लोकांचे हाल पाहून ब्रिटीश सैनिकही भावूक झाले आहे. तेथील अराजकतेची स्थिती पाहून अनेकांना आपले अश्रु आवरता आले नाही.
सध्या सोशलवर तेथील सद्यस्थितीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. या फोटो आणि व्हिडियोमध्ये काबूल विमानतळावर हजारो लोकांची गर्दी आहे. यात महिला आणि मुलेदेखील आहेत. तिथे चारही बाजूला आरडाओरडा, गोंधळ, पळापळ सुरू आहे. अफगाण महिला रडून अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांकडे दयायाचना करत आहेत.ही सर्व परिस्थिती पाहून कठोर सैनिकांच्या डोळ्यातदेखील पाणी तराळले आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत
तर काही व्हिडियोमध्ये अफगाणिस्तान सोडण्याच्या आशेने विमानतळावर पोचणाऱ्या महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्या मदतीसाठी अमेरिकन सुरक्षा रक्षकांकडे रडून रडून मदत मागत आहे. दरम्यान,महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर जमले आहे. सगळीकडे आरडा-ओरडा सुरू होता. एकच गोंधळाची परिस्थिती होती.





