घरातच सहा दिवस लपवला मुलाचा मृतदेह

मेढा (प्रतिनिधी)- जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द या गावामध्ये आई-वडिलांनीच मुलाचा मृतदेह तब्बल 6 दिवस घरातीलच एका बंद खोलीत ठेवल्याची घटना घडली आहे.
जावली तालुक्यातील कंटेन्मेंट झोनमधून शुक्रवारी म्हाते खुर्द गावाची मुक्तता झाली. मात्र, आज तेथील एका मुंबईकर कुटुंबाने आपल्याच मुलाचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू होऊन ही मृतदेह लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली असून संबंधित मुलाचा मृतदेह रात्री उशीरा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नकार दिला त्यामुळे पुन्हा मृतदेह मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द गावामध्ये जयवंत दळवी आपल्या पत्नी दोन मुलासह 27 मार्च रोजी गावी होते मुलगा अर्णव हा गेली 7-8 महिने आजारी होता पण आज येथील त्यांच्या घराशेजारील ग्रामस्थांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना घरातील बंद खोलीत अर्णव जयवंत दळवी (वय १६) हा कुजलेल्या मृतावस्थेत आढळला. मृतदेहामध्ये जंतू झाल्याने त्याची परीसरात दुर्गंधी सुटली होती. याच घरामध्ये त्याचे आईवडील व भाऊ राहात होते. ५ ते 6 दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू होऊनही या कुटुंबाने ही गोष्ट लपवून ठेवल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला त्यानंतर तातडीने प्रशासकिय व आरोग्य यंत्रणा पोहोचली. त्यांनी संबंधित मुलाचा मृतदेह तपासणीसाठी मेढा व त्यानंतर सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात नेला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व मृतदेहाला 72 तास उलटून गेल्यामुळे कोरोनाची तपासणी करता येतं नाही त्यामुळे मृतदेह पुन्हा मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणला गेला. या प्रकारामागे घातपात की नैसर्गिक मृत्यू याचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेबाबत गावासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
तब्बल 20 वर्षानी गावी परतले होते कुटुंब
देशामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर अनेक चाकरमन्यानी आपल्या जन्मभूमीत जाणे पसंद केले. मात्र या कुटुंबाने तब्बल २० वर्षांनी गावाकडे आले होते त्यामुळे शेजाऱ्यांशीही फारसा संपर्क नव्हता त्यातच घरोघरी सर्वे करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आपला मुलगा मतिमंद असल्याची महिती दिली. तर पुढे जाऊन आपला मुलगा आजच मृत पावला आहे अशी खोटी माहिती ग्रामस्थांना दिली तर मृतदेहाल 72 तास उलटून गेल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले
सक्क्या भावालाही घरी येउ नको सांगितले :
या बाबत आणखी माहिती अशी की जयवंत दळवी याचा भाऊ अंकुश हे ही मुंबईहून गावी महाते येते होत मात्र घरात जागा छोटी आहे तू तुझ्या कुटुंबासहित तुझ्या सासुरवाडी मालचौडी (ता.जावळी) येथे रहा असे या कुटुंबाकडुन सांगण्यात आले . मग या घटनेमागे नक्की आई वडलांचा पूर्वनियोजित कट होता की आणखी काय कारण होते याचा तपास पोलीस घेत आहे.





