अकोला – मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये आत्महत्याच्या घटना अधिक दिसून येत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ताजे असताना विदर्भातून एका तरुणीच्या मृत्यूचं वृत्त आलं आहे. अर्धवट जळालेल्या मृतदेहाजवळ कपड्याची बॅग, सायकल आणि चिठ्ठी मिळाली आहे. त्यामुळे ही हत्या की, आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
अकोला शहरनजीक असलेल्या यावलखेड शिवारात सतरा ते आठरा वर्षीय तुरुणीचा अर्धवट जळालेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी निंबी मालोकार येथील रहिवासी आहे.
तरुणीच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत आई-वडिलांची माफी मागण्यात आललेली आहे. तसेच आता माझ्या लग्नासाठी खर्च करावा लागणार नाही, असंही नमूद करण्यात आलं आहे. मृतदेहाजवळ एक कपड्याने भरलेली बॅगही आढळून आली आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. मृत तरुणी यावलखेड शिवारात कशी आली ? तिला जाळण्यात आलं की, तिने जाळून घेतलं, असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेले पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ करत आहेत.