इस्लामाबाद – अमेरिकेच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जितकी एफ 16 विमाने दिली होती ती जशीच्या तशी शाबूत असल्याचे म्हंटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त अमेरिकन मासिकाने प्रसारीत केले होते. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याच वृत्ताचा आधार घेत भारतावर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत सत्य नेहमीच टिकते आणि तेच सर्वोत्तम धोरण असल्याचे म्हंटले आहे. भारतीय जनता पक्ष हा युद्धाची परिस्थिती असल्याचे दाखवून आणि पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडल्याचा खोटा दावा करून आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानातील एफ 16 विमानांच्या ताफ्यातून कोणतेही विमान कमी झाले नसल्याचे अमेरिकेच्या संरक्षण अधिकार्यांनी सांगितल्याचा पुनरूच्चार इम्रान खान यांनी केला. https://twitter.com/ImranKhanPTI/status/1114437455602749441