नवी दिल्ली – भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत गुजरातची सत्ता राखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यातील घवघवीत यश पक्षाला सुखावणारे आहे. तसे असले तरी, भाजपला दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील निकालांमुळे सलग दोन दिवसांत दोन राजकीय हादरे बसले आहेत.
दिल्ली पालिका निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्या निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे भाजपची पालिकेतील सलग पंधरा वर्षांची सत्ता संपुष्टात आली. त्या निकालापाठोपाठ गुरूवारी गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.
दमदार यश मिळवून भाजपने गुजरात आपला बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. पण, त्या पक्षाला हिमाचलची सत्ता गमवावी लागली. भाजपकडून याआधी सातत्याने कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली गेली. मात्र, भाजपला ती घोषणा सहजासहजी सत्यात उतरवणे शक्य होणार नसल्याचे हिमाचलने दाखवून दिले आहे.
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नी यांना प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री केसरकर
त्याशिवाय, दिल्लीत जिंकणाऱ्या आपने गुजरातची निवडणूक लढवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याची कामगिरी साध्य केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आता कॉंग्रेसपाठोपाठ आपच्या रूपाने आणखी एक महत्वाचा प्रतिस्पर्धी भाजपच्या विरोधात उभा ठाकणार आहे.