घंटा नाद ठीक, मात्र… – अजित पवार संतापले

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरामध्ये आज जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता आपल्या राहत्या घराच्या आवारातून घंटा नाद करत कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार व्यक्त केले. मात्र ही घंटा नाद करण्याची ‘पद्धत’ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचलेली दिसत नाही. याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी गर्दी टाळण्याची आवश्यकता असताना काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी गर्दी करत ‘घंटा नाद’चा कर्यक्रम केला. घंटा नाद करताना झालेल्या गर्दीमुळे अजित पवार चांगलेच रागावले असून त्यांनी आपला संताप ट्विटरद्वारे व्यक्त केलाय.

याबाबत व्यक्त होताना ते लिहतात, “कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद,थाळीनाद करून त्यांचे आभार व्यक्त केले,त्यांचेही आभार! परंतु,लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून,एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही. लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं.”

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांचा हा टोला नेमका कोणत्या लोकप्रतिनिधींसाठी होता हे अद्याप स्पष्ट झालं नाही. कोरोना विषाणू हा अत्यंत संसर्गक्षम असल्याने अजित पवारांनी उपस्थित केलेला हा मुद्दा वैध असून अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे चुकीचेच असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत.

You might also like
16 Comments
 1. Milind Y Phatak says

  लोकप्रतिनिधींनी खूपच काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासारखे पोशिंदे वरूना वायरस ने ग्रस्त होऊ नये यांनी त्यांची काळजी स्वतःची खूप घेतली पाहिजे

 2. Milind Y Phatak says

  लोकप्रतिनिधींनी खूपच काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासारखे पोशिंदे करोना वायरस ने ग्रस्त होऊ नये यांनी त्यांची काळजी स्वतःची खूप घेतली पाहिजे. त्यांना जर काही झालं तर प्रजेची काळजी कोण घेणार ??

 3. प्रकाश दिगडे says

  १००% बरोबर आहे. स्वत:ची प्रसिध्दी करण्याची हवस व त्यासाठी मुळ उद्देश बाजुला ठेवल्या जातो. शरमेची बाब आहे.

 4. Narendra says

  मुख्य मंत्र्यांनी किती गर्दी जमा केली होती ते बघा आधी. जसा काही दसरा मेळावा च आहे

 5. Shridhar Vaishampayan says

  स्टॉप unnecessary trafic on roads ,looking recennt traficjams,banpetrolpumps giving regularly proper code with immediate effect.

 6. Shridhar Vaishampayan says

  Chief minister is expected to be more responsible! atleast ( Maharastra).

 7. Vijay says

  Dusra kade bot naka dakhvu

 8. GORAKH SANGALE says

  अगदी बरौबर आहे दादा तुमचं.आपण एकमेव राजकारणी आहात ज्यांना हे आवडले नाही.घंटानाद करुन आभार मानण्याऐवजी आरोग्य यंत्रणेतील लोकांना आवश्यक सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन emergency hospitals उभे करण्याची घोषणा व्हावी.लोकांना मास्क दिले जावेत.ग्रामीण भागात sanitisers पुरवावेत.रुग्णांना सुविधा पुरवाव्यात.पण दुर्दैव असे की फक्त टाळ्या वाजवणे,भांडी फोडणे भारतीयांच्या नशिबी आले. दादांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे.

 9. राजेंद्र शिरसाट says

  दादा, मुंबईतील गर्दी पहिली थांबवा.लोकल बंद करायला केंद्राने शेवटी आदेश दिले।१४४कलम जाहीर केले, पण पोलिसांना कुठलेच आदेश नाही।सकाळपासून रस्त्यावर गर्दी दिसते. ठोकाठोकिचे आदेश द्या, निवडणूक खूप लांब आहे. नाही तर इटली सारखी अवस्था होईला वेळ लागणार नाही.

 10. सुरेश डोळे says

  पाश्र्चात्य देशाचं जसेच्या तसे अनुकरण करणे आपल्या देशात गेल्या ५/६ वर्षांत अतिरेक झाला आहे. त्यात विनाकारण आयजीच्या जिवावर बायजी, परदेश दौरे तर उत आहे.

  भारतीय परंपरा, पध्दत, रितीरिवाज दूर करून अंधानुकरण कधीच संरक्षीत किंवा सुरक्षित होऊ शकत नाही, याचा सद्य परिस्थितीत कोणी विचारच करत नाही.

  कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असताना सामुहिक घंटानाद, टाळीनाद न करता दूरदर्शन किंवा पत्र वृत्तसेवा माध्यमातून अनेकांचं आभार प्रदर्शन करणे शक्य होते.

  म्हणजे काळजी घ्या आवाहन करायचे आणि सामुदायिक उपक्रमाला प्रोत्साहन द्यायचे आणि आपलेच कौतुक करत वाहवा करायचे. व्वा काय गंमतच आहे ना.

 11. Vaidya kamalakar Laxman says

  घंटा वाजवली तर कोयना व्हायरस नष्ट होतो या व्हाट्स एप वरून पसरविलेल्या अन्धश्रध्देचे हे फलित आहे. आपल्या नेत्यांनी सुध्दा दुसर्या देशाचे अनुकरण कॉपी करतांना सामान्य जनतेची मानसिक पातळी लक्षात घेणे गरजेचे आहे. या उत्सवी प्रमाणात एकही करोना बाधित असल्यास काय भावात पडेल.

 12. Shivkumar Pore says

  माननीय अजित पवार यांचे म्हणने अगदी बरोबर ़
  घंटा वादन व टाळ्या वाजवायला रस्त्यावर येणे चुकिचे आहे़ ़

 13. Maruti wanve says

  दादा घंटा नाद हा वेगळाच नाद आहे. तो corona आहे कुणाच्याच बापाचं ऐकत नाही. तो घंट्याच काय ऐकणार. म्हणून काळजी घेतली पाहिजे. घरात राहून शंख वाजवला पाहिजे म्हणजे फुपूस मजबूत होईल. सावधान रात्र वैऱ्याची आहे आणि दिवस पण वाईट आहेत. तुमच्या मताशी सहमत.

 14. शैलेश अभ्यंकर says

  ते सगळे ठिक आहे पण एका खोलीत ७-८जण राहतात त्यांनी काय करायचे
  ह्यावर विचार कधी होणार आहे का?

 15. Deepak Thakare says

  मुर्ख आहेत लोकं ज्यांनी रस्त्यावर ऊतरून , गर्दी करून घंटानाद करण्याचे प्रदर्षन केले.घरात किंवा गच्चीवर ऊभे राहुन घंटानाद करणय़ाचे अपेक्शित होते .मात्र लोकांनी पदयात्रा काढुन मोदी साहेबांचे व अजीत पवार साहेबांच्या मनसुब्यावर पाणी फेरले.धन्य हो अशा भारतीय जनतेला ??

 16. Umesh Raypure says

  आमदारानां तीस लाखांचे (30,00000) बिना व्याजाने कज॔ देऊ शकता,

  मग राज्यातल्या सव॔ गरिबांना तिस (30,000) हजाराचे कज॔ द्यावे ,

  मग ते घरातन नाहिच निघनार,

  हातावर पोट भरणारे आपल्या परिवाराचा सांभाळ कसा करावा हे सरकारने सांगावे…..”

Leave A Reply

Your email address will not be published.