पिंपरी – आमच्या नातेवाईक महिलेला का भेटतो, असे म्हणत दोन जणांनी एका तरुणास दगडाने मारहाण केली. ही घटना काळाखडक, वाकड येथे मंगळवारी (दि. 10) रात्री घडली. अमोल रामचंद्र पवार (रा. चिंचवड) व अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गणेश सूर्यभान चाटे (वय 32, रा. चऱ्होली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री फिर्यादी हे काळाखडक येथे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली.