Dr. Ashok Modak passes away : माजी आमदार आणि मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष. डॉ. अशोकराव मोडक यांचे निधन झाले आहे. त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली असून, मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. गेल्या एका वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या पाश्चात परिवारात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधानाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. अशोकराव मोडक यांचा जन्म 1940 मध्ये झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. आणि राज्यशास्त्रात एम.ए. आणि जेएनयूमधून येथून पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात येत असायची. 1963 ते 1994 पर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. 2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पाच वर्षे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक पदाने सन्मानित केले. त्यांनी 104 प्रबंध आणि 40 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. दोन दिवसांपूर्वीच चतुरंग प्रतिष्ठानकडून डॅा. अशोकराव मोडक यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी एबीव्हीपीच्या माध्यमातून अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थी आणि युवा विकासात सक्रियपणे सहभागी नोंदविला. छत्तीसगडमधील बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. तसेच महाराष्ट्र विधानसभेतील पदवीधर मतदारसंघातून आमदार देखील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अशोक मोडक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार डॉ अशोकराव मोडक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. वैचारिक मंथन आणि शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच होते. भारतीय तत्त्वज्ञान, एकात्म मानवदर्शन आणि वीर सावरकर इत्यादींवर विपुल लेखन त्यांनी केले. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. रशिया आणि भारत संबंध हा सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. छत्तीसगड केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति हेही वाचा : एलॉन मस्कच्या ‘X’ ला केंद्राची नोटीस ! ‘तसा’ कंटेंट काढण्याचे दिले आदेश ; ७२ तासांच्या आत मागितला रिपोर्ट