Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025 | राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. १४३ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर उद्या २१ डिसेंबर रोजी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे. राज्यातील अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव सूर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशिम, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आला. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली गेली. त्यानुसार २ डिसेंबर रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी आज मतदान होत आहे. सर्व संबंधित ठिकाणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता मतमोजणी सुरू होईल. Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025 | विरोधी महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला याचा फैसला या निमित्ताने होणार आहे. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळेही नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025 | हेही वाचा: ‘गांधी’ नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक