Satara | जिल्ह्यात सरासरी 35.8 मिमी पाऊस

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात शनिवार, दि. 14 रोजी सरासरी 35.8 मिमी पावसाची नोंद झाली. दि. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 393.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) – सातारा 32.4 (348.2), जावळी 24.9 (574.0), पाटण 107.4 (561.3), कराड 71.3 (362.4), कोरेगाव 8.3 (321.8), खटाव 8.5 (294.2), माण 2.6 (245.3), फलटण 3.5 (274.1), खंडाळा 2.3 (161.9), वाई 11.9 (279.4), महाबळेश्वर 73.1 (1183.1).
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 51.46 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाल्याचे कृष्णा सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळवले आहे. धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे (कंसात धरणसाठ्याची टक्केवारी) – मोठे प्रकल्प – कोयना 35.32 (35.28), धोम 3.11 (26.08),
धोम-बलकवडी 0.80 (20.20), कण्हेर 3.35 (34.93), उरमोडी 2.17 (22.49), तारळी 2.26 (38.70), मध्यम प्रकल्प – येरळवाडी 0.221 (31.94), नेर 0.073 (17.55), राणंद 0, आंधळी 0.047 (17.94), नागेवाडी 0.058 (27.62), मोरणा 0.870(66.92), उत्तरमांड 0.425 (48.94), महू 0.783 (71.83), हातगेघर 0.105 (42.00), वांग (मराठवाडी) 1.868 (68.68).





