पुणे जिल्हा | माळेवाडीतील कलाविष्काराने प्रेक्षक भारावले

पळसदेव, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातील माळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या संयुक्तविद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी सुमारे 50 विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
बाल कलाकारांनी मराठी, हिंदी चित्रपट गीतावरील नृत्य, लोकनृत्य, कोळी नृत्य, लावणी, देशभक्तीपर गीत, विनोदी नृत्य, गवळण, विनोदी नाटिका अशा अनेक कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य भारत बांडे, शिक्षिका रुपाली बनकर, अंगणवाडी सेविका वैशाली बनसुडे, मयुरी शिंदे, मदतनीस पूनम बनसुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल बनसुडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, उपसरपंच कैलास भोसले, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बनसुडे, कोमल बनसुडे, सुभाष बनसुडे, रमेश शेलार, अश्विनी नारखेडकर, भारत शेंडे, बबन बनसुडे,
पोलीस पाटील कल्पना फुले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वनिता बनसुडे, युवा मंडळाचे अध्यक्ष किरण बनसुडे, किरण काळे, विकास बनसुडे, ज्ञानेश्वर बनसुडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या वेळी प्रक्षकांनी बालकलाकारांवर बक्षीसांचा वर्षाव केला.





