- उद्या तळेगावात आरक्षण सोडत – तहसीलदार बर्गे यांची माहिती
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 मधील सरपंच पदाच्या आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 29) सकाळी 11.30 वाजता येथील भेगडे लॉन्स कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांनी दिली.
पूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली होती. ती रद्द केली पुन्हा आरक्षण सोडत होत असल्याने काही बदल होणार की, आहेत तेच राहणार ही उत्सुकता निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे, उर्से, कामशेत, टाकवे बुद्रुक, आंबी, नवलाख उंब्रे आदी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता शिगेला पोहोचली आहेत.
मावळ तालुक्यातील 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी यांचे संदर्भीय आदेशामध्ये नमूद केल्यानुसार मावळ उपविभागीय अधिकारी संदेश शिर्क यांचे नियंत्रणाखाली मावळ तालुक्यातील एकूण 103 ग्रामपंचायतींकरिता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत करण्यात येणार आहे.
या सोडतीस आपण वेळेवर उपस्थित रहावे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोडतीस उपस्थित राहताना शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.