पुणे – कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून 94 कोटी 42 लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकल्याप्रकरणात मुबंई येथून एका महिलेस चतृ:श्रृगी पोलिसांनी अटक केली आहे. तीला 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नियतजहॉ नासिर अन्सारी (37, भायखळा, पश्चिम मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आत्तापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही 4 आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. बॅंकेच्या सर्व्हर हॅक करून एटीएमचा डाटा चोरण्यात आला. या डाटाचा वापर करून अन्सारी आणि पाहिजे असलेला आरोपी नासिर उस्मानगनी अन्सारी यांनी 109 क्लोन डाटाच्या माध्यातून 83 लाख 74 हजार 400 रुपये काढले.