जबरी चोरी करणाऱ्या सराईतांना अटक

पिंपरी – जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईतांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडील दोन गुन्हे तपासामध्ये उघड झाले आहेत. गोरख लक्ष्मण जाधव (वय-56रा. चंदनननगर, पुणे) व अशोक अभिमान पवार (वय-23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीसंदर्भात पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक प्रवीण कांबळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विठ्ठलवाडी येथील देहू-आळंदी रोडवरील अभिरुची लॉजजवळ दोन संशयित इसम थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता गोरख व अशोक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यातील 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 1.5 ग्रॅमचा सोन्याचा बदाम असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, प्रवीण कांबळे, शैलेश सुर्वे, आशिष बनकर, गणेश कोकणे, शरीफ मुलाणी व आशिष बोटके या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.