पिंपरी | पवना विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थांंचा स्नेह मेळावा संपन्न

पवनानगर – पवना विद्या मंदिर पवनानगर विद्यालयातील एकाच बाकावर बसलेले व भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील सवंगडी मित्र,मैत्रिणी शाळेची इयत्ता दहावी ब च्या बॕचच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने रविवार (दि.२३) रोजी तब्बल १४ वर्षांनी एकत्र आले होते.
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक क्षणाचा आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत कार्यक्रम घेण्यात आला.सन २००९-१० मधील पवना विद्या मंदिर विद्यालयातील माजी विदयार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.तसेच विद्यार्थ्यांकडून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण करण्याचा मोठ्या संकल्प केला यामध्ये विद्यार्थ्यांकडून ६० झाडे लावण्यात आली.
या वेळी पवना विद्या मंदिर शाळेचे शिक्षक बबन तांबे,संजय हुलावळे, लक्ष्मण मकर,महादेव थोरात,धनंजय खाडे,श्रद्धा मोहोळ व मोहिनी ढोरे यांंचा विद्यार्थांंनी सन्मान केला.व सर्व शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच या स्नेह संमेलनात विविध आपल्या आठवणींना उजाळा देत शालेय आठवणी जागृत करत आपली मते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण ओझरकर तर आभार राहुल मोहोळ यांनी मानले.या कार्यक्रमासाठी अमेश पडवळ,मंगेश शेळके,निलम पडवळ,सुभाष भोते,पूजा सांगडे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी पवना विद्या मंदिर विद्यालयतील १० वी ब चे सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी उपस्थीत होते.





