मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्यावर पक्षात सध्या मोठी जबाबदारी काही दिवसांपूर्वी सोपवण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत.
View this post on Instagram
येत्या काळात संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहे. या निवडुणकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे राज्यभरात दौरे करत आहे. त्यांच्यासह मुलगा अमित ठाकरे हादेखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यानचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ह्या फोटोवरून अमित ठाकरे यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,’बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे ना त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात,तरी नम्रता बघा किती आहे फक्त नेता असून चालत नाही.उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो,कोणताही गर्व न बाळगता हा १ दिवस महाराष्ट्राच भविष्य नक्कि बदलेल’ या कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आला आहे.