Medha Rana : ‘बॉर्डर २’ चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये देशभरात अंदाजे २७३ कोटी रुपयांची कमाई केली असून चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळला असून, चित्रपटातील कलाकारांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटात इतर अभिनेत्रींच्या तुलनेने कमी दाखवण्यात आलेले पात्र अभिनेत्री मेधा राणी हिचे आहे. तिच्याही कामाचे कौतुक होत आहे. तिने वरुण धवनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका खास मुलाखतीत मेधा राणा हिने तिच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल आणि वैयक्तिक अनुभवांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. बॉर्डर २ तिच्या पहिल्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये तिने अनुभवी कलाकारांसोबत काम केले आहे. याबद्दल विचारले असता जे तिच्यासाठी सर्वात कठीण दृश्य होते, असे तिने सांगितले. चित्रपटातील एका सीनचा हवाला देत अभिनेत्री म्हणाली, होशर जिथे जात आहे आणि मी दारात उभी आहे ते दृश्य. हे तेच दृश्य आहे जिथे मला रडावेसे वाटते. ते खूप भावनिकदृष्ट्या थरथरलेले होते आणि त्यासाठी खूप संयम आवश्यक होता, जे चित्रित करणे आव्हानात्मक होते, अशी आठवण मेधाने सांगितली. भावना आणि कथा ज्या पद्धतीने चित्रपटात टिपल्या आहेत. ते पाहून मला वाटते की त्यांनी ते सुंदरपणे साकारले आहे. चित्रपट ज्या पद्धतीने काम करत आहे आणि पहिल्या चित्रपटाने ज्या पद्धतीने काम केले आहे, ते याचा पुरावा आहे. भावनिक पैलू खूप चांगल्या प्रकारे टिपले आहेत, असे देखील मेधा राणा म्हणाली. मेधा राणा हिच्या अभिनयाचे वरुण धवन आणि चित्रपटातील इतर कलाकारांनी खूप कौतुक केले आहे. ती आता इतर चित्रपटांसाठी ऑडिशन देत असल्याचे तिने सांगितले. हेही वाचा : Lok Sabha adjourned: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून आजही सभागृहात गोंधळ; लोकसभा अध्यक्षांची भाजप-काँग्रेस खासदारांसोबत बैठक