Pune : स्वारगेट प्रकरणातील आरोपीची तब्बल ‘इतके तास’ कसून चौकशी; पण गाडेची पोलिसांना….

पुणेः स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविषयी दररोज अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सदर गुन्हा हा स्वारगेट पोलिसांनाकडून गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात गाडेची तब्बल तीन तास कसून चौकशी केली आहे. पण गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. गाडेची गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली आहे.
पोलिसांकडून गाडेच्या मोबाईचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. नुकताच गाडेचा पोलीस गणवेशातील फोटो समोर आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. तसेच पोलिसांकडून केलेल्या तपासात गाडेचा स्वारगेट बसस्थानकासह, सोलापूर, अहिल्यानगर आणि पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात वावर असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून गाडेच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात असा संशय पोलिसांना आहे. यामुळे या प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या शक्यतांचा आधार घेत तपास करत आहेत.
लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून गाडे याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तीन तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीत गाडेने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती मिळत आहे. गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बसस्थानकात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडेने एका २६ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत दोनदा बलात्कार केला. यानंतर गाडे फरार झाला होता. पोलिसांनी गाडेला गुनाट गावातील शेतातून अटक केली.




