मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची जोरदार तयारी सुरू; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

BMC Election 2026 | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या सर्व 227 जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढविणार आहे.
याआधी पक्षाची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी, राज्यसभेचे खासदार संजय सिंह उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुंबईत येणार आहेत. BMC Election 2026 |
Aam Aadmi Party declares it’s list of Star Campaigners for the upcoming BMC elections! pic.twitter.com/Vt809juXpH
— AAP Mumbai (@AAPMumbai) December 22, 2025
तसेच महाराष्ट्रातील व मुंबईतील स्थानिक पातळीवरील नेतृत्वालाही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली असून मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन, किशोर मंध्यान, रुबेन मस्कारेन्हास, विजय क्षीरसागर, अजिम फारुकी, विजय कुंभार, मुकुंद किर्दत यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. BMC Election 2026 |
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज भरण्यास प्रारंभ : २३ डिसेंबरपासून
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ३० डिसेंबर
अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत : २ जानेवारी २०२६
चिन्हवाटप व उमेदवारांची अंतिम यादी : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
हेही वाचा:





