पिंपरी | सातव्या वेतन आयोगाचा फरक चार टप्यांत मिळणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपी कर्मचार्यांना सात्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम चार टप्प्यांत दिली जाणार आहे. पीएमपीएमएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने बैठक घेणेबाबत मागच्या महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी कामगार युनियनच्या वतीने विनंती करण्यात आली होती.
त्यास अनुसरून आज पुणे शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पीएमपी कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक चार टप्यात द्यावा, तसेच 240 दिवस भरलेल्या सर्व बदली रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक दिपा-मुधोळ, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पीएमपीएमएलचे पिंपरी चिंचवडमधील कामगार प्रतिनिधी संतोष शिंदे, दिपक गायकवाड,आनंद महा़ंगडे तसेच राष्ट्रवादीचे विजय लोखंडे, नाना काटे, प्रशांत शितोळे उपस्थित होते.
पीएमपीएमधील कामगारांना सातवा वेतन आयोग फरकासहीत लागु करण्याबाबत 2021 मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. पीएमपी कामगगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरलेला होता.
पीएमपीच्या 11 000 कर्मचार्यांना डिसेंबर 2022 पासुन सातवा वेतन दोन टप्प्यांत आयोग लागु करण्यात आलेला आहे .
1 एप्रिल 2017 पासुन ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचा 68 महिन्यांचा फरक देण्यासाठी 561 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
पुणे महापालिकेच्या 60 टक्के स्वामित्वानुसार336 कोटी होत आहेत व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के स्वामित्वानुसार 224.60 कोटी पीएमपीला देणे क्रमप्राप्त होते.
कामगारांमधध्ये आनंदाचे वातावरण
पुणे महापालिकेच्या 60 टक्के स्वामित्वानुसार 141.07 कोटी रुपये तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के स्वामित्वानुसार 94.06 कोटी निधी त्वरित पीएमपीकडे वर्ग करण्याच्या सूचना केली आहे.
याशिवाय 11000 कर्मचार्यांना वेतन आयोगाचा फरक मिळणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच 1,748 रोजंदारी कामगारांना कायमकरण्याचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.





