2026 FIFA World Cup qualifiers : भारताचा आज बलाढ्य कतारशी सामना…

Bhubaneswar : – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा तसेच आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी भारताच्या पुरुष संघाला आहे. आज (Tuesday, November 21, at 07:00 p.m. IST ) भारताचा बलाढ्य कतारशी सामना होणार आहे.
भारतीय संघाने या पात्रता स्पर्धेच्या पहिल्या लढतीत कुवेतचा 1-0 असा पराभव केला होता. 2016 सालच्या स्पर्धेतही पात्रता फेरीचा दुसरा सामना भारत व कतार यांच्यातच झाला होता. हा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला होता व त्यामुळे भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरु शकला नाही.
Just 5️⃣ 𝗗𝗮𝘆𝘀 𝘁𝗼 𝗴𝗼 for the #FIFAWorldCup Qualifiers at the iconic #KalingaStadium. ⚽
🇮🇳 India vs Qatar 🇶🇦
🗓️ 21 November 2023
🕖 07:00 PM
To book your seats, click on the link 🔗 below 👇
🎟️ https://t.co/CLYS4dUXhj pic.twitter.com/vn1BA5zZ0h
— Odisha Sports (@sports_odisha) November 16, 2023
2019 सालीही या दोन संघातील लढत गोलशून्य बरोबरीच झाली होती. याच वर्षी कतारने आशिया करंडक जिंकला होता मात्र, त्यांना भारताला पराभूत करता आले नव्हते. कतारविरुद्ध आता होणार असलेल्या सामन्यात भारतीय संघाला कर्णधार सुनील छेत्रीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.




