मुंबई – जेव्हा स्मार्टफोन नव्हते, साधे सेट मोबाईल होते. तेव्हाही लोक एकमेकांशी ‘चॅट’ करायचे. ‘चॅटिंग’ हा शब्द तेव्हा फारसा प्रचलित नव्हता. आता स्मार्टफोनचे युग आले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सऍपद्वारे, विशेषत: जोडप्यांमध्ये भरपूर चॅटिंग होताना दिसते.
चॅटिंग करताना लोक बर्याचदा लहान-लहान शब्दांचा (शॉर्ट वर्ड्स) वापर जलद टाइप करण्यासाठी आणि कमी शब्दात संदेश लिहिण्यासाठी करतात. अनेकांना या छोट्या शब्दांमुळे संपूर्ण गोष्ट समजत नाही.
चला तर, आज आम्ही तुम्हाला मेसेजिंग किंवा चॅटिंग दरम्यान वापरल्या जाणाऱ्या अशा काही लहान शब्दांबद्दल (शॉर्ट वर्ड्स) सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
* व्हॉट्सऍपवर चॅटिंग करताना LOL, LOlz आणि ROFL सारखे छोटे शब्द प्रचलित आहेत. यामध्ये LOL चे पूर्ण रूप Laugh out loud म्हणजे मोठ्याने हसणे आहे. तर, LOlz म्हणजे more than one laugh म्हणजे अधिक जास्त मोठ्याने हसणे, तर ROFL चे पूर्ण रूप Rolling on the floor laughing म्हणजेच जमिनीवर लोळून हसणे आहे.
* ILY, BFF आणि IDK सारखे छोटे शब्द देखील चॅटिंग दरम्यान खूप वापरले जातात. यामध्ये ILY म्हणजे I Love You अर्थात मी तुझ्यावर प्रेम करतो, तर BFF म्हणजे Best friends forever कायमचे चांगले मित्र, तर IDK म्हणजे I Don’t Know म्हणजेच मला माहित नाही, असा अर्थ होतो.
* याशिवाय, काही लोक चॅटिंग दरम्यान ASAP, BTW, COZ सारखे लहान शब्द देखील वापरतात. या मध्ये ASAP म्हणजे As soon as possible शक्य तितक्या लवकर. BTW म्हणजे By the way बाय द वे आणि COZ म्हणजे Because म्हणजेच कारण.
* GTSY म्हणजे Glad to see you म्हणजेच तुम्हाला पाहून आनंद झाला. HBTU म्हणजे Happy birthday to you म्हणजेच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. RIP म्हणजे Rest in peace म्हणजे आत्म्यास शांती लाभो. हा शॉर्ट वर्ड सामान्यपणे जेव्हा कुणाचा मृत्यू झाला असेल, तेव्हा शोक व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.