मुंबई – यावर्षी म्हणजेच, मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला 15 लाख 75 हजार 103 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारून महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.91 आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.90 टक्के आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बालकरांनी सुद्धा परीक्षेत चांगलं यश मिळवलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या बाल कलाकार ‘दिवेश मेदगे’ याला दहावीच्या परिक्षेत तब्बल 90.60% इतके गुण मिळाले आहेत. दिवेशनं झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत लहानपणीचे शंभूराजे साकारले होते. दरम्यान, यासंदर्भात खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिवेशचं कौतुक केलं आहे. https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/posts/3781094045240424 तसेच, दिवेश पाठोपाठ ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटात झेंडुची भूमिका साकारलेली बालकलाकार ‘सायली भंडारकवठेकर’ हिला तब्बल 98 टक्के गुण मिळाले आहेत. चित्रपटात ती गणितात कच्ची होती. मात्र दहावीच्या खऱ्याखुऱ्या परिक्षेत गणित विषयात तिला तब्ब्ल 96 गुण मिळाले आहेत.