‘त्या’ वक्तव्याचा राज्यभरात पडसाद !
Updated On:

मुंबई – प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात त्योच पडसाद उमटत असून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने केली जात आहेत.
यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
सुरेश पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. मात्र, “त्या’ वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.
आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.





