Sholay : शोलेच्या ‘त्या’ सीनवर सेन्सारने लावली होती कात्री ; 49 वर्षांनी सीनचा फोटो होतोय व्हायरल….

१९७५ मध्ये रिलीज झालेला शोले सिनेमाने लोकांच्या पसंतीची पावती मिळवत अॅायकॅानिक सिनेमा बनला. या सिनेमाची स्टोरी आणि त्यात अभिनय करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. शोले तयार होत असताना त्यावेळी अनेक किस्से घडले होते. आजही या सिनेमाच्या किस्सांबद्दल प्रेक्षक भरभरून बोलतात. या सिनेमाच्या एखादा किस्सा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतोच.
अमिताभ बच्चन, धर्मेंद, संजीव कुमार, हिमा मालनी, जया बच्चन, आसरानी या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप शोलेमधून दाखवून दिली. या सिनेमाच्या एका सीनसाठी अभिनेता धर्मेंद यांनी खऱ्याखुऱ्या बंदुकीचा वापर केला असल्याचे सांगितले जाते. नुकताच या सिनेमातील एका सीनचा फोटो व्हायरल होत असून तो सीन सेन्सारने सिनेमातून काढून टाकला होता असे सांगण्यात आले आहे.
या सिनेमातील डिलीट केलेल्या सीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात गब्बर दरोडेखोरांमधील एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. मात्र, हा सीन सिनेमा प्रदर्शित होताना सेन्सॉर बोर्डाने डिलीट करण्यास सांगितले होते. या सीनमध्ये खूप हिंसा दाखवण्यात आली आहे, असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे होते, म्हणून हा सिनेमा सिनेमातून काढून टाकण्यात आला होता.
काय होता डिलीट सीन ?
सिनेमातील डिलीट करण्यात आलेल्या सीनचा फोटो ओल्ड इज गोल्ड नावाच्या इंस्ट्राग्राम अकाऊंडवरून शेअर करण्यात आला आहे. या सीनमध्ये सचिन पिळगावकर यांचे क्रूरपणे अमजद खान केस ओढताना दिसत आहे. त्याच्या शेजारीच दरोडेखोरांची टोळी उभी आहे. या सीनवर अनेकांनी कमेंट केली असून, पुन्हा एकदा चित्रपटगृहात शोले रिलीज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


