पत्रकाराचा तो प्रश्न अन् शरद पवार म्हणाले झोप झालीये ना तुमची? कोल्हापूरातील किस्स्याची जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना एक किस्सा घडला आहे. त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. काल चार तासांचा प्रवास करून आल्यानंतर शरद पवार कोल्हापूरमध्ये पोहचले. याचवेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद एक किस्सा घडला आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस झाला. देशभरातून आणि विदेशातूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूरातील पत्रकार परिषद यावर बोलताना मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही. असं शरद पवार म्हणाले. पण त्या अगोदर झालेला एक किस्सा त्याची जोरदार चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवारांना शरद पवार साहेब, तुमचे शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस झाला, तुम्ही…यावेळी शरद पवारांनी पत्रकाराला थांबवलं आणि मोदी माझे शिष्य? झोप झाली आहे ना तुमची? असा सवाल केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढं बोलताना शरद पवार म्हणाले, मी ७५ व्या वर्षानंतर थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावं हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे.
शिवछत्रपतींचा दिला दाखल म्हणाले…
राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. यावर भाष्य करताना शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला दाखल दिला. शिवछत्रपतींकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा दुष्काळ पडला होता.
त्यावेळी दुष्काळ पडल्यानंतर पाऊस आला पण शेतकऱ्यांकडे साधनं नव्हती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीतून सोनं बाहेर काढलं आणि सोन्याचा फाळ केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरल्याशिवाय राहता कामा नये, असं ते म्हणाले.
आज घडीला अतिवृष्टी, जमीन वाहून जाणं, शेतकऱ्यांचं नुकसान असं सगळं झालं आहे. आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहतो आहे. देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा : राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत गोदाबाईंचा व्हिडिओ ; मतं कशी डिलीट केली जातात सगळं दाखवलं





